Navyugmarathi

कोणते Debt funds 2024 मध्ये विकत घेतल्याने होईल फायदा चला पाहूया

Debt funds 2024: बहुतेक लोक हे त्याच्या गुंतवणुकीवर जास्त फायदा मिळेल यावर लक्ष देतात. त्यांच्यासाठी डेट फंड हा सर्वात सुरक्षित आणि कमी जोखीम असलेला फंड आहे ज्यातून तुम्ही नफा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल आणखी बरेच काही

What Is Debt Fund In Mutual Funds?

डेट फंड हे अशे फंड आहेत ज्यामध्ये तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळते, जसे की सरकारी सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बाँड्स, कमर्शियल पेपर्स, ट्रेझरी बिले आणि इतर अनेक मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स.

या फंड मध्ये मिळणारा व्याजदर आणि केव्हा मिळणार याची तारीख ही आधीच निश्चित केली जाते त्यामुळे यावर बाजारातील चढउतारांचा काही परिणाम होत नाही. यामुळे हा फंड कमी जोखमीचा फंड मानला जातो.

Types of Debt Funds?

  • लिक्विड फंड
  • मनी मार्केट फंड
  • डायनॅमिक बाँड फंड
  • कॉर्पोरेट बाँड फंड
  • बँकिंग आणि PSU फंड
  • क्रेडिट रिस्क फंड
  • फ्लोटर फंड
  • ओव्हर नाईट फंड
  • गिल्ट फंड
  • अल्प कालावधीचा फंड
  • कमी कालावधीचा फंड
  • अल्ट्रा-शॉर्ट कालावधी फंड
  • मध्यम कालावधीचा फंड
  • मध्यम ते दीर्घ कालावधीचा फंड

Features Of Debt Mutual Funds

सुयोग्यता:

स्थिर परतावा सुनिश्चित करण्यासाठी डेट फंड सामान्यत: विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे मिळणारा परतावा हा निश्चित असतो. हा फंड कमी जोखीम असलेले गुंतवणूकदार त्यांना आदर्श मानला जातो. हे फंड अल्प-मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी आणि मध्यम-मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी अगदी योग्य आहेत.

परतावा:

डेट म्युच्युअल फंड हे इक्विटी फंडांपेक्षा कमी परतावा देतात. या फंडचे व्याजदर हे कमी जास्त होत राहतात.

जोखीम:

  1. क्रेडिट रिस्क – यामध्ये फंड मॅनेजर ठरलेले व्याजदर देण्यास असमर्थ ठरू शकतात.
  2. लिक्विडिटी रिस्क – काही वेळेला रिडेम्प्शन विनंत्या पूर्ण करण्यासाठी फंड हाऊस पुरेशी लिक्विडिटी नसू शकते.

How a Debt Mutual Fund Operates?

प्रत्येक डेट फंडची क्रेडिट रेटिंग असते जी गुंतवणूकदाराला मदत करते की कोणता फंड निवडावा आणि कोणता फंड किती किती व्याजदर देईल हे या रेटिंग वर ठरते. ज्या फंडचे त्या फंड मध्ये गुंतवणुकीची जोखीम कमी असते.

हे पण वाचा : अबब तुम्हाला माहिती आहेत का म्युच्युअल फंडचे हे प्रकार

What Are Debt Funds In India?

  • आदित्य बिर्ला  सन लाइफ लिक्विड फंड डायरेक्ट ग्रोथ
  • एचडीएफसी शॉर्ट टर्म डेट फंड डायरेक्ट प्लान ग्रोथ
  • ग्रो ओवरनाइट फंड डायरेक्ट ग्रोथ
  • क्वांट लिक्विड डायरेक्ट फंड ग्रोथ
  • एसबीआय बँकिंग आणि पीएसयू फंड डायरेक्ट ग्रोथ
  • पराग पारिख लिक्विड फंड डायरेक्ट ग्रोथ
  • कोटक लॉन्ग ड्यूरेशन फंड डायरेक्ट ग्रोथ
  • निप्पॉन इंडिया अल्ट्रा शॉर्ट ड्यूरेशन फंड डायरेक्ट ग्रोथ
  • एलआईसी एमएफ लिक्विड फंड डायरेक्ट ग्रोथ
  • आईसीआईसीआई प्रूडेंशियल लिक्विड फंड डायरेक्ट प्लान ग्रोथ
  • ॲक्सिस डायनॅमिक बाँड फंड
  • आईसीआईसीआई प्रुडेन्शियल गिल्ट फंड
  • सुंदरम लो ड्युरेशन फंड

The Best Way to Invest In Debt Funds 2024

तुम्ही थेट AMC मार्फत डेट फंडात गुंतवणूक करू शकता किंवा कोणत्याही ब्रोकरद्वारे डेट फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

Why Debt Mutual Funds Are A Good Investment?

व्यावसायिक कौशल्य आणि परतावा:

डेट फंडमध्ये तुम्हला तुमच्या गुंतवणुकीवर व्याजदर मिळवण्याची संधी देते. डेट फंड किरकोळ गुंतवणूकदारांना मनी मार्केट आणि होलसेल डेट मार्केटमध्ये प्रवेश देते, या दोन्हीमध्ये ते थेट गुंतवणूक करू शकत नाहीत.

चांगला गुंतवणूक पर्याय:

डेट फंड हे संपूर्ण मॅच्युरिटी आणि क्रेडिट रिस्क स्पेक्ट्रममध्ये दिले जातात. कमी मुदतीचे फंड हे अंदाजित व्याजदर मिळवून देतात तर जास्त कालावधीचे फंड हे थोडा जास्त नफा मिळवून देतात.

लिक्विड फंड, ओव्हरनाइट फंड, कॉर्पोरेट बाँड फंड आणि शॉर्ट-टर्म फंड हे काही फंड आहेत जे अल्ट्रा-शॉर्ट आणि अल्प-मुदतीत चांगला परतावा मिळवून देऊ शकतात.

कमी जोखीम:

डेट म्युच्युअल फंड इक्विटी फंडांच्या मानाने कमी जोखमीचे असतात हे फंड सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात त्यामुळे जोखीम कमी असते आणि स्थिरता अधिक असते. ज्यांना कमी वेळात आपल्या गुंतवणुकीवर चांगले व्याजदर हवे आहे त्यांचासाठी हा फंड चांगला आहे.

तरलता

डेट फंड हे अत्यंत तरल असतात आणि ते जलद गतीने रिडीम केले जाऊ शकतात. सहसा रिडेम्पशन विनंती केल्यापासून एक किंवा दोन कामकाजाच्या दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या निर्धारित बँकेत जमा केले जातात.

या फंडसाठी कोणताही निर्धारित कालावधी नाही. त्यामुळे तुम्ही हा फंड कधीही रिडिम करू शकता. काही फंड लवकर पैसे काढण्यासाठी काही किरकोळ शुल्क आकारू शकतात, सर्वसाधारणपणे, म्युच्युअल फंड गुंतवणूक काढण्यासाठी कोणतेही दंड नाहीत.