Navyugmarathi

Rakesh Jhunjhunwala Net Worth: कसे बनवले 5000 रुपयापासून 40,000 करोड रुपयांचे साम्राज्य

Rakesh Jhunjhunwala Net Worth: भारतीय शेअर मार्केटमधील वॉरेन बफेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी कशी उभा केली करोडोंची संपत्ती चला जाणून घेऊया.

Who Is Rakesh Jhunjhunwala

राकेश झुनझुनवाला हे भारतीय शेअर मार्केट मधील एक एक मोठ नाव आहे. त्यांना आपण भारतीय शेअर मार्केटमधील वॉरेन बफेट म्हणून देखील ओळखतो त्यांनी आपला शेअर मार्केट चा प्रवास हा अवघ्या 5000 रुपयात चालू केला होता जो आज जवळपास 40,000 करोड पर्यंत जाऊन पोहचला आहे.

लहानपणापासूनच त्यांना शेअर मार्केटची आवड होती आणि त्यासाठीच त्यांनी आपले शिक्षण हे  बीकॉमधुन पूर्ण केले.

हे पण वाचा : एका निर्धाराने केली करोडोंची कंपनी स्थापन

Rakesh Jhunjhunwala Family Details

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 1960 मध्ये हैद्राबाद, भारत येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील एक आयकर अधिकारी होते, त्यामुळेच त्यांना लहान वयातच टॅक्स आणि शेअर्स काय असते याची माहिती मिळाली व त्यांचा फायनान्सशी संपर्क झाला. त्याच्या पत्नी ही एक स्टॉक ट्रेडर आहेत व त्यांना तीन मुले आहेत.

Rakesh Jhunjhunwala Net Worth

राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या शेअर मार्केट करियरची सुरवात ही अवघ्या 5,000 रुपयापासून केली होती त्यांनी आपली पहिली गुंतवणूक ही टाटा टी मध्ये केली होती. जेव्हा त्यांनी टाटा टी मध्ये गुंतवणूक केली होती तेव्हा त्या शेअरची किंमत ही 43 रुपये प्रति शेअर होती आणि त्यांनी तेच शेअर तीन महिन्यांनी 143 रुपये प्रति शेअरला विकले. व त्यानून खुप नफा मिळवला.

त्यानंतर त्यांनी अनेक शेअर मध्ये गुंतवणूक केली त्यातील एक शेअर म्हणजे टायटन या शेअरने त्यांना खूप नफा मिळून दिला.

त्याची एकूण संपत्ती अंदाजे $5.8 अब्ज म्हणजे अंदाजे 40,000 (2022 पर्यंत) होती.

Rakesh Jhunjhunwala Education

राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये सिडनहॅम कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली आणि नंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मध्ये प्रवेश घेतला. ते व्यवसायाने सीए जरी असले तरी एक कुशल गुंतवणूकदार होते.

Rakesh Jhunjhunwala Wife

Rakesh Jhunjhunwala Wife

रेखा झुनझुनवाला या राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. त्या स्वतः सुद्धा भारतीय शेअर बाजारातील स्टॉक ट्रेडर आणि अब्जाधीश गुंतवणूकदार आहेत.

Rakesh Jhunjhunwala Akasa Air

अकासा एअरलाइनमध्ये झुनझुनवाला यांनी जवळपास 278 करोड रुपयांची  गुंतवणूक केली होती. या गुंतवणूकीमुळे त्यांना व त्यांच्या पत्नीला अकासा एअरलाइनची एकूण 40% हिस्सेदारी मिळाली.

ज्यावेळी त्यांनी अकासा एअरलाइनमध्ये गुंतवणूक केली तेव्हा ते म्हणाले होते की ‘अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. मी एअरलाइन का सुरू केली. त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी मी असे म्हणेन की मी अपयशी होण्यास तयार आहे. काहीच प्रयत्न न करण्यापेक्षा प्रयत्न केल्यानंतर अपयशी होणे चांगले.

Rakesh Jhunjhunwala Portfolio

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टपोलिओत सण 2022 पर्यंत एकूण 30 हून अधिक कंपन्या होत्या.

 

Rakesh Jhunjhunwala Awards and Honors

  • पद्मश्री (2023)

Rakesh Jhunjhunwala Overview 

नाव राकेश झुनझुनवाला
जन्म दिनांक 5 नोव्हेंबर 1960
जन्मस्थान हैद्राबाद, भारत
मृत्यू 14 ऑगस्ट  2022
वय 62 वर्षे (इ.स. 2022)
व्यवसाय स्टॉक ट्रेडर, अब्जाधीश गुंतवणूकदार आणि चार्टर्ड अकाउंटंट.
संस्थापक आकासा एअर, हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट
शिक्षण चार्टर्ड अकाउंटन्सी (CA)
धर्म हिंदू
राष्ट्रीयता भारतीय
नेटवर्थ  ₹40,000 कोटी
वैवाहिक स्थिती विवाहित