Navyugmarathi

Mutual Funds Types In India: अबब तुम्हाला माहिती आहेत का म्युच्युअल फंडचे हे प्रकार

Mutual Funds Types In India: भारतात सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचे साधन म्हणजे म्युच्युअल फंड पण तुम्हाला माहिती आहे काय की या म्युच्युअल फंडचे किती पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, आणि कोणता फंड किती परतावा मिळवून देईल चला तर मग जाणून घेऊया.

Mutual Funds Types In India

Debt funds:

डेट फंड हे तुमचे पैसे डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवतात, जसे की सरकारी बॉण्ड, कंपनी डिबेंचर आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या इतर सिक्युरिटीज. डेट फंड हा म्युच्युअल फंडाच्या सर्वात सुरक्षित प्रकारांपैकी एक आहे. यात तुम्ही अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही गुंतवणूक करू शकता. इक्विटी फंडांप्रमाणेच डेट फंड हे डेट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्सच्या मॅच्युरिटी कालावधीवर अवलंबून असतात.

डेट फंडचे प्रकार गुंतवणिकीचा कालावधी
Incredibly Short Term Funds 3-6 महिने
Short Term Funds 1-3 वर्षे
Mid Term Funds 3-4 वर्षे
Medium To Long Term Funds 4-7 वर्षे
Long Term Debt Funds 7 पेक्षा जास्त वर्षे

Income funds:

इन्कम फंडला आपण ULIP (युनिट-लिंक्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन) म्हणूनही ओळखतो. या फंडचे उद्धिष्ट हे गुंतवणूकदाराना जास्तीत जास्त नफा मिळवून देणे हा आहे. यात फंड ची रक्कम ही सरकारी सिक्युरिटीज किंवा gsecs/gilts, डिबेंचर्स, बॉण्ड्स, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज यात गुंतवली जाते.

Growth funds:

ग्रोथ फंड हा प्रामुख्याने जास्त नफा मिळवून देणाऱ्या कंपन्यांवर गुंतवणूक करतो जरी यात तुम्हाला जास्त नफा मिळवून देण्याची क्षमता असली तरी हा फंड सर्वात रिस्की फंड म्हणूनही ओळखला जातो कारण यात कधी कधी तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.

Hybrid funds:

हायब्रीड म्युच्युअल फंड हा स्टॉक आणि बॉण्ड्स या दोन्हीत एकदम गुंतवणूक करतो जेणेकरून गुंतवणुकीतील रिस्क कमी होऊन जास्त नफा मिळवला जाईल.

हे पण वाचा: How To Invest In Mutual Funds

Liquid funds:

या फंडलाआपत्कालीन निधी म्हणूनही ओळखले जाते नावाप्रमाणेच या फंड मधील रक्कम तुम्ही कधीही काढू शकता. तसेच या फंड मध्ये कमी रिस्क आणि कमी व्याजदर आपणास बगण्यास मिळते.

Equity funds:

प्रामुख्याने इक्विटी फंड हे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी फंड हे अधिकतर गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. कारण तो कमी वेळात जास्त परतावा देतो.

Interval funds:

इंटरव्हल फंड हा एक क्लोज-एंड फंड आहे. जो एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध नसतो जो वेळोवेळी भागधारकांकडून शेअर्सची पुनर्खरेदी करण्याची ऑफर देतो.

Money market funds:

मनी मार्केट फंड हा म्युच्युअल फंडातील सर्वात कमी रिस्क असलेला फंड मानला जातो. मनी मार्केट फंड हा उच्च-गुणवत्तेची, अल्पकालीन कर्जे यात गुंतवणूक करतो. हा फंड 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी कंपन्यांना कर्ज देण्याचे काम करतो आणि त्यातून नफा मिळवतो.

Close ended funds:

क्लोज-एंड फंड हा सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी एका इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे निश्चित संख्येत शेअर जारी करतो आणि त्यातून भांडवल उभा करतो.

Aggressive Growth funds:

आक्रमक ग्रोथ फंड हा अशा कंपन्यात गुंतवणूक करतो जातुन सर्वात जास्त नफा मिळेल. पण या फंड मध्ये सर्वात जास्त जोखीम देखील असते.

Asset allocation funds:

असेट अलॉटमेंट फंड हा गुंतवणूकदारांचे त्यांचे पैसे बाँड आणि इक्विटी या दोन्हींमध्ये गुंतवणूक करतो आणि त्यातून नफा मिळवतो. यात अनेक गुंतवणूकदार  गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी पैसे गुंतवतात.

Fixed maturity Funds:

फिक्स्ड म्याचुरिटी फंड हा एक  क्लोज-एंड फंड आहे. जो गुंतवणूकदारांना ठराविक रक्कम परतावा म्हणून देतो. या फंडला सर्वात सुरक्षित फंड म्हणून देखील ओळखले जाते.

Capital protection funds:

कॅपिटल प्रोटेक्शन फंड हा गुंतवणुकीतील काही भाग परत देण्याचे वचन देतो यात जरी कंपनीला नुकसान झाले तरी तुम्हाला ठरलेली रक्कम ही परत मिळते. हा एक क्लोज-एंड फंड आहे.

Tax-saving Funds (ELSS):

ELSS हा  फंड तुम्हाला आयकर कपातीसाठी दावा करण्याची परवानगी देतो. आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत समाविष्ट असलेल्या ELSS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही वर्षाला ₹ 1.5 लाखांपर्यंत कर वाचवू शकता.

Global funds:

ग्लोबल फंड हा एक असा फंड आहे जो गुंतवणूकदाराला जगात कुठेही कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याची मुभा देतो.

Mid Cap funds:

मिड-कॅप फंड हा एक प्रकारचा इक्विटी म्युच्युअल फंड आहे. हा फंड प्रामुख्याने मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो (ज्या कंपन्यांचे मार्केट कॅप ₹ 5,000 कोटींपेक्षा जास्त परंतु ₹ 20,000 कोटींपेक्षा कमी आहे)

Sector funds:

सेक्टर म्युच्युअल फंड हा प्रामुख्याने अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करतो जसे की  ऊर्जा क्षेत्र, पायाभूत सुविधा इत्यादी.