Navyugmarathi

SRM Contractors Limited IPO: एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक असेल का चांगला पर्याय?

SRM Contractors Limited IPO:  हा आयपीओ 130.20 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 0.62 कोटी शेअर्स फ्रेश असतील. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश आयपीओ आहे.

SRM Contractors Limited IPO

एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडचा IPO हा 26 मार्च 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 28 मार्च 2024 रोजी बंद होईल. एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे सोमवार, एप्रिल 1, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. BSE, NSE वर बुधवार, 3 एप्रिल, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.

एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹200 ₹210 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 70 शेअर्सचा आहे. आणि किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक असलेली किमान गुंतवणूक ₹14,700 आहे.

तसेच sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 14 लॉट (980 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹205,800 आहे आणि bNII साठी, ती 69 लॉट (4,830शेअर्स) आहे, ज्याची रक्कम 1,014,300 आहे.

Interactive Financial Services Ltd  ही एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर Bigshare Services Pvt Ltd हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

About SRM Contractors Limited

एसआरएम काँट्रॅक्टर्स लिमिटेडची स्थापना ही 2008 मध्ये झाली असून कंपनी अभियांत्रिकी बांधकाम आणि विकास या क्षेत्रात काम करते. कंपनीची विशेषतः ही रस्ते, टनल्स बनवण्यात आहे.

जम्मू आणि काश्मिर आणि लदाखच्या केंद्रशासित प्रदेशांत कंपनीने आपला चांगला दबदबा प्रस्तापित केला आहे. एसआरएम काँट्रॅक्टर्स ही ईपीसी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करते. कंपनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी युनिट-किंमतीवर तर पायाभूत सुविधा बांधकाम प्रकल्पांसाठी उपकंत्राट वर काम करते.

31 जानेवारी 2024 पर्यंत, कंपनीमध्ये 275 कर्मचारी काम करत होते ज्यात कामगार आणि विशेषज्ञ यांचा समावेश होता.

कंपनीचे हे प्रमुख बिसिनेस आहेत:

रस्ते प्रकल्प: कंपनीकडे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यासारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूल, रस्ते आणि महामार्ग यांचे निर्माण, रुंदीकरण, सुधारणा, जीर्णोद्धार, आणि/किंवा मजबुतीकरण आणि सुधारणा आणि त्यांची देखभाल करणे, त्यांचे नियोजन आणि बांधकाम करणे यांसारखे प्रकल्प आहेत.

टनल प्रकल्प: जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन बोगद्यांचे डिझाइन आणि बांधकाम, हिमस्खलन आणि भूस्खलन संरक्षण वर कंपनी काम करत आहे. तसेच विद्यमान बोगद्यांचे स्थिरीकरण यासह विस्तार, सुधारणा, पुनर्स्थापना आणि बळकटीकरण यांचा समावेश आहे.

स्लोप स्टॅबिलायझेशनची कामे: कंपनी डोंगर, पर्वत यासारख्या भागात स्लोप स्टॅबिलायझेशनची कामे पहाते. यात तटबंदीचचे नियोजन आणि बांधकाम यांचा समावेश आहे.

इतर विविध नागरी बांधकाम उपक्रम: सरकारी घरे आणि निवासी बांधकाम, ड्रेनेजचे काम तसेच सिंचन आणि पूर संरक्षण काम कंपनी करते.

SRM Contractors Limited IPO Details

IPO Date 26 मार्च 2024 ते 28 मार्च 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹200 ते ₹210 प्रति शेअर
Lot Size 70 शेयर्स
Total Issue Size 6,200,000 शेयर्स (₹130.20 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 6,200,000 शेयर्स (₹130.20 कोटींचा अंदाजित )
Issue Type बुक बिल्ट इश्यू IPO
Listing At BSE, NSE
Share holding pre issue 16,744,200
Share holding post issue 22,944,200

Timeline Of SRM Contractors Limited IPO

एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडचा आयपीओ हा मंगळवार, मार्च 28, 2024 रोजी ओपन होईल आणि गुरुवार, मार्च 28, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date मंगळवार, मार्च 26, 2024
IPO Close Date गुरुवार, मार्च 28, 2024
Basis of Allotment सोमवार, एप्रिल 1, 2024
Initiation of Refunds मंगळवार, 2 एप्रिल, 2024
Credit of Shares to Demat मंगळवार, 2 एप्रिल 2024
Listing Date बुधवार, 3 एप्रिल, 2024
Deadline to confirm UPI mandate मार्च 28, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : Krystal Integrated Services Limited IPO 2024

Financial Details Of SRM Contractors Limited

एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.24% अधिक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 6.71% अधिक नफा कमावला आहे.

Period Ended 30 सप्टेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 168.87 137.36 120.22 112.47
Revenue 242.28 300.65 265.51 161.95
Profit After Tax 21.07 18.75 17.57 8.27
Net Worth 37.24 63.16 44.41 26.85
Reserves and Surplus 67.48 46.41 42.89 25.32
Total Borrowing 42.32 47.16 31.52 31.96

SRM Contractors Limited Key Factors

एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडचे मार्केट कॅपिटल हे रु. 481.83 कोटी आहे.

KPI Values
ROCE 29.43%
Debt/Equity 0.5
RoNW 25.02%
P/BV 4.17
PAT Margin (%) 8.98