Navyugmarathi

How To Invest In Mutual Funds: कशी करावी गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये, काय आहेत याचे फायदे आणि तोटे?

How To Invest In Mutual Funds: जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू  शकता. यात तुम्हाला तुमच्या FD आणि इतर गुंतवणुकीपेक्षा अधिक चांगला परतावा मिळू शकतो.

What Is The Mutual Funds?

गुंतवणुकीतील सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड, हा एक असा फंड आहे जो लोकांकडून पैसे गोळा करून तो शेअर मार्केट मध्ये गुंतवला जातो आणि त्यातून मिळणारा परतावा पुन्हा गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या शेअर प्रमाणे वितरित केला जातो.

यात एक गोष्ट लक्ष देण्यासारखी अशी आहे की म्युच्युअल फंड मध्ये जमा केलेली रक्कम ही कोणत्याही शेअर मध्ये अशीच गुंतवली जात नाही तर यासाठी काही नियम आहेत, तसेच या फंड ची देखभाल करण्यासाठी एक फंड मॅनेजर देखील असतो जो या नियमाचे पालन करूनच पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवतो.

Required Documents Before Investing In Mutual Funds?

  • तुमच्या वर्तमान फोटोसह PAN कार्ड.
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • मतदान ओळखपत्र
  • वाहन परवाना
  • रेशन कार्ड
  • वीज बिल
  • बँक अकाउंट स्टेटमेंट

हे पण वाचा: Anupam Mittal Net Worth 2024

How To Invest In Mutual Funds?

How To Invest In Mutual Funds

गुंतवणूकदाराची प्रोफाइल समजून घेणे:

तुम्हाला जर एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी त्या फंडची प्रोफाईल समजून घेणे महत्वाचे आहे. यात त्या फंड ने मागील काही वर्षात किती परतावा दिला आहे. त्याचा फंड मॅनेजर कोण आहे त्याने किती आणि कसा परतावा मिळून दिला आहे हे पाहणे महत्वाचे आहे.

तसेच तुम्हाला किती परतावा पाहिजे आहे आणि किती वेळात हे सर्व पाहूनच तुमच्या प्रोफाइलशी जुळणारा म्युच्युअल फंड निवडा.

योग्य म्युच्युअल फंड निवडणे:

योग्य म्युच्युअल फंड निवडणे हे खूप गरजेचे आहे यात इक्विटी, डेट किंवा हायब्रीड आणि त्याच्या उपश्रेण्या निवडाव्या लागतील. यात एक लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी की लार्ज-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक ही स्मॉल-कॅप किंवा मिड-कॅप म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा कमी जोखमीची असते.

एकदा तुम्ही मूल्य गुंतवणूक किंवा वाढीसह जायचे आहे की नाही हे ठरविल्यानंतर, जोखीम-समायोजित परतावा, बाजारपेठेतील कार्यप्रदर्शन आणि खर्चाचे प्रमाण यावर आधारित, उपलब्ध विविध प्रकारांमधून तुम्ही योग्य म्युच्युअल फंड निवडू शकता. हे मालमत्ता वाटप ऑप्टिमाइझ करण्यात मदत करतील.

Mutual Funds Pro’s

प्रोफेशनल मॅनेजमेंट:

जेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये जास्त विचार करण्याची गरज नसते कारण हे फंड हे प्रोफेशनल मॅनेजमेंटद्वारा चालवले जातात. तसेच कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी मॅनेजरला काही नियम व अटींचे पालन करावे लागते जेणेकरून कमीत कमी नुकसान होईल.

परवडणारी क्षमता:

म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कमीत कमी 500 रुपयापासून गुंतवणूक सुरु करू शकता यात तुम्ही महिन्याची SIP किंवा एकदम एक रक्कम भरून गुंतवणूक सुरु करू शकता.

तरलता:

म्युच्युअल फंडमध्ये होणारे सर्व व्यवहार हे पारदर्शक असतात जेणेकरून कोणताही गुंतवणूकदार कधीही पैसे गुंतवू शकतो तसेच कधीही पैसे काढू शकतो.

Mutual Funds Con’s

खर्च:

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक एक चांगला पर्याय असला तरी यात काही अपारदर्शक खर्च ही आहेत जसे की प्रशासकीय शुल्क, व्यवस्थापन शुल्क आणि इतर खर्चांचा समावेश असू शकतो.

गुंतवणूकदारांवर नियंत्रण नाही:

कोणत्या शेअर, बॉण्ड इत्यादी मध्ये किती पैसे गुंतवायचे यावर गुंतवणूकदारांचे नियंत्रण नसते हे सर्व फंड मॅनेजर ठरवतो यामुळे कधी कधी मिळणारा परतावा हा कमी-अधिक असू शकतो.

परताव्यातील चढ – उतार

म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा हा कमी अधिक असू शकतॊ हा परतावा मार्केट मधील चढउतार, फंड मॅनेजर इत्यादी वर अवलंबून असू शकतो.

Mutual Funds Risk’s

महागाईचा धोका:

जर तुम्ही दीर्घकाळ म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले तर कधी कधी महागाईचा दर हा तुमच्या परताव्या पेक्षा अधीक असू शकतो.

व्याजदर जोखीम:

म्युच्युअल फंडमधील व्याजदर हे कधीच निश्चित नसते त्यामुळे जे वर्तमानात तुम्हाला व्याजदर मिळत आहे ते भविष्यात तितकेच मिळेल हे निश्चित नसते कदाचित ते कमी अधिक असू शकते.

बाजारातील जोखीम:

तुम्ही कोठेही गुंतवणूक करताना एक गोष्टीची जोखीम ही कायम असते ती म्हणजे बाजाराची. कधी कधी बाजारातील खराब कामगिरी तुमच्या मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम करू शकतो.

How To choose Mutual Funds

बँकांच्या माध्यमातून:

अनेक बँक या आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात यासाठी तुम्हाला त्या बँकेत खाते असणे गरजेचे आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म:

तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कोणतेही ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून गुंतवणूक करू शकता जसेकी एंजल वन ,झिरोधा ,ग्रो  इत्यादी.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( एसआयपी ):

जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसतील तर तुम्ही एसआयपी करू शकता यात तुम्हाला महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते.

डायरेक्ट बनाम रेग्युलर प्लॅन:

एसआयपीच्या उलट जर तुम्हाकडे खुप पैसे असतील तर तुम्ही एकदम पैसे कोणत्याही एका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता.