Navyugmarathi

TBO Tek Limited IPO: टीबीओ टेकचा आयपीओ 8 मेला येणार

TBO Tek Limited IPO: हा आयपीओ 1,550.81 कोटी रुपयांचा असेल.  हा आयपीओ दोन्ही प्रकारचा असेल फ्रेश आणि ऑफर. या आयपीओमध्ये 400 कोटी रुपयांचे 0.43 कोटी फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील. तर एकूण 1,150.81 कोटी रुपयांचे 1.25 कोटी शेअर्स हे ऑफरचे असतील.

TBO Tek Limited IPO

टीबीओ टेकचा आयपीओ 8 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 10 मे 2024 रोजी बंद होईल. टीबीओ टेकच्या आयपीओचे वाटप हे सोमवार, 13 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. NSE, BSE वर बुधवार, 15 मे, 2024 रोजी याची अंतिम यादी जाहीर होईल.

टीबीओ टेकच्या आयपीओची प्राइस बँड ₹875 ते ₹920 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 16 शेअर्सचा आहे आणि  ₹14,720 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच sNII साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 14 लॉट (224 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹206,080 आहे. तर कमाल लॉट आकाराची गुंतवणूक 68 लॉट (1,088 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹1,000,960 आहे.

Jefferies India Private Limited, Axis Capital Limited, Jm Financial Limited आणि Goldman Sachs (India) Securities Private Limited हे टीबीओ टेकच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Kfin Technologies Limited आहेत.

About TBO Tek Limited

टीबीओ टेकची स्थापना 2006 मध्ये झाली होती. पूर्वी याला Tek Travels Private Ltd म्हणून ओळखले जात होते.ही कंपनी जागतिक प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून 100 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.

कंपनी त्यांच्या ग्राहकांना गरजेनुसार सर्वसमावेशक प्रवास सेवा उपलब्ध करून देते तसेच विदेशी विदेशी चलन सहाय्यांसह विस्तृत चलनांचे समर्थन देते.

कंपनी एअरलाइन्स, हॉटेल्स, क्रूझ, कार भाड्याने देणे, विमा, रेल्वे तसेच किरकोळ खरेदीदार जसे की ट्रॅव्हल एजन्सी आणि स्वतंत्र प्रवास सल्लागार यांच्याशी कंपनी अखंडपणे व्यवहार करते.

टीबीओ टेकचे बुकिंग प्रतिदिन वाढतच गेले आहे जसे की कंपनीचे बुकिंग 2021 मध्ये 13396 होते तर 2023 मध्ये 40164  आणि  2024 मध्ये ते वाढून 44592 इतके झाले आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत, कंपनीमध्ये 1717 कर्मचारी काम करत होते. 2023 मध्ये प्रवास आणि पर्यटन उद्योग US$ 1.9 ट्रिलियनचा होता. तर 2027 पर्यंत US$ 2.6 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा विचार आहे.

TBO Tek Limited IPO Details

IPO Date 8 मे, 2024 ते 10 मे, 2024
Face Value ₹1 प्रति शेयर
Price Band ₹875 to ₹920 प्रति शेअर
Lot Size 16 शेयर्स
Total Issue Size 16,856,623 शेयर्स (₹1,550.81 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 4,347,826 शेयर्स (₹400.00 कोटींचा अंदाजित )
Offer for Sale 12,508,797 शेयर्स (₹1,150.81 कोटींचा अंदाजित )
Issue Type बुक बिल्ट इश्यू IPO
Listing At BSE, NSE
Share holding pre issue 104,239,961
Share holding post issue 108,587,787

Timeline Of TBO Tek Limited IPO

टीबीओ टेकचा आयपीओ हा बुधवार, 8 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि शुक्रवार, 10 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date बुधवार, 8 मे , 2024
IPO Close Date शुक्रवार, 10 मे, 2024
Basis of Allotment सोमवार, 13 मे, 2024
Initiation of Refunds मंगळवार, 14 मे, 2024
Credit of Shares to Demat मंगळवार, 14 मे, 2024
Listing Date बुधवार, 15 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate शुक्रवार, 10 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : काय विशेष असेल इंडिजीन लिमिटेडच्या आयपीओमध्ये

Financial Details Of TBO Tek Limited

टीबीओ टेकने गेल्या वर्षीच्या तुलनेत 112.09% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 340.4% नफा कमावला आहे.

Period Ended 31 डिसेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 3,754.05 2,557.93 1,271.43 576.16
Revenue 1,039.56 1,085.77 511.93 176.55
Profit After Tax 154.18 148.49 33.72 -34.14
Net Worth 501.21 337.19 231.90 204.07
Reserves and Surplus 478.43 317.57 214.08 197.58
Total Borrowing 2.93 6.36 2.69

 

TBO Tek Limited IPO Key Factors

टीबीओ टेकच्या आपीओचे बाजार मूल्य हे रु. 9990.08 कोटी आहे.

KPI Values
RoNW 30.76
P/BV 18.66

FAQ’s

What Is the TBO Tek Share Price?

टीबीओ टेकच्या प्रति शेअर ची किंमत ही ₹875 ते ₹920 आहे.

How can I apply for the IPO of TBO Tek? 

टीबीओ टेकच्या आयपीओमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तुम्ही UPI किंवा ASBA वापरून TBO Tek IPO मध्ये ऑनलाइन अर्ज करू शकता. किंवा एखाद्या आधीकृत ब्रोकर्सद्वारा गुंतवणूक करू शकता. किंवा ऑनलाईन ॲप्स जसे की  Upstox, 5Paisa, Zerodha, Nuvama, ICICI बँक, HDFC बँक आणि SBI बँक द्वारे गुंतवणूक करू शकता.