Navyugmarathi

Ritesh Agarwal Net Worth: रितेश अग्रवाल यांनी कशी उभा केली करोडोची संपत्ती चला पाहुया

Ritesh Agarwal Net Worth:दिल्ली येथे शिक्षण घेत असताना एकदा असेच एक 18-19 वर्षाचा मुलगा  फिरत फिरत मस्जिद मोठ रोड वर एका गल्लीत जाऊन बसला तेव्हा त्यांच्याकडे मात्र 30 रुपये होते आणि तेही संपत आले होते तेव्हा त्याला वाटले की आता आपण परत आपल्या गावी जावे पण त्याच्या मनात विचार आला कि आपण पाहिलेल्या स्वप्नाचे काय जाच्यासाठी आपण दिल्लीत आलेला.

मग काय त्याने दिल्लीच्या रस्त्यांवर सिम कार्ड विकण्यापासून सुरवात केली व आज तो मुलगा जगातील सर्वात तरुण अरबपती पैकी एक आहे.

हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून OYO चे सीईओ आणि संस्थापक रितेश अग्रवाल हे आहेत. तुम्हाला माहिती आहे काय की त्यांनी याची सुरवात कशी केली आणि ते कसे बनले भारतातील सर्वात तरुण अरबपती पैकी एक चला तर मग जाणून घेऊया त्यांची ही रोमांचक कहाणी.

Who Is Ritesh Agarwal

रितेश अग्रवाल यांचा जन्म हा 1993 मध्ये बिसम कटक, ओडिशा, भारत येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब ओडिशातील रायगडा येथे एक छोटेसे दुकान चालवत असे. कॉलेजला जाण्यापूर्वी त्यांनी सेक्रेड हार्ट स्कूल आणि नंतर सेंट जॉन्स सीनियर सेकेंडरी स्कूलमधून पदवी प्राप्त केली व नंतर 2011 मध्ये पुढील शिक्षणासाठी दिल्लीला शिफ्ट झाले. 

हे पण वाचा : Vineeta Singh Sugar Cosmetics

Ritesh Agarwal OYO

Who is Ritesh Agarwal

 

रितेश अग्रवाल जेव्हा 17 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी भारतभर प्रवास करण्याचे ठरिवले तेव्हा ते असेच फिरत फिरत एका हॉटेल मध्ये गेले तेव्हा त्यांनी पहिले की हॉटेल ची सेवा खुप चांगली आहे आणि हॉटेलचे भाडे ही सर्वसाधारण व्यक्तीला परवडणारे होते तरीपण हॉटेल्स मधील बऱ्याच रूम्स ह्या रिकाम्या होत्या.

तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की भारतामध्ये बजेट हॉटेल्स आणि चांगल्या दर्जाच्या हॉटेल्सची मोठी कमतरता आहे. त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येकजण सुंदर डिझाइन केलेली, आकर्षक आणि आरामदायी हॉटेल्स मध्ये राहण्यासाठी पात्र आहे.

यातूनच त्यांना OYO ची कल्पना सुचली व त्यांनी मे 2013 मध्ये याची स्थापना केली आणि आज OYO हॉटेल्स, घरे आणि मोकळ्या जागा यांची जगातील सर्वात मोठी साखळी आहे.

Ritesh Agarwal Family Details

रितेश अग्रवाल यांच्या  कुटुंबात 4 सदस्य आहेत, त्यांचे वडील रमेश अग्रवाल, यांचे 10 मार्च 2023 रोजी निधन झाले. रमेश अग्रवाल हे देखील एक व्यापारी होते.

Ritesh Agarwal Net Worth

सिमकार्ड विकण्यापासून सुरवात झालेला त्याचा प्रवास आज सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश होण्यापर्यंत खूप रोमांचक आहे. त्यांनी त्यांचा हा प्रवास कठोर परिश्रमावर पार केला आहे.

अवघ्या वयाच्या 29 व्या वर्षी त्यांची एकूण संपत्ती रु. 16,000 कोटी होती तर त्यांनी स्थापन केलेल्या OYO चे मार्केट कॅपिटल हे रु.74,000 कोटी इतके आहे.

Ritesh Agarwal Education

Ritesh Agarwal Education

रितेश अग्रवालन यांनी सेंट जॉन्स सीनियर सेकंडरी स्कूल, कोटा, राजस्थानमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस अँड फायनान्स, दिल्ली येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला, परंतु 2013 मध्ये थिएल फेलोशिपसाठी निवड झाल्यानंतर त्यांनी शिक्षण मधूनच सोडले.

Ritesh Agarwal Wife

रितेश अग्रवाल यांनी मागील वर्षी म्हणजे 7 मार्च 2023 रोजी गीतांशा सूदसोबत लग्न केले होते. त्यांचा जन्म हा उत्तर प्रदेश मध्ये लखनौ येथे झाला असून त्या फार्मेशन वेंचर्स प्राइवेट लिमिटेडच्या डायरेक्टर आहेत. ही कंपनी उत्तर प्रदेश येथील कानपुरमध्ये रजिस्टर आहे.

Ritesh Agarwal Shark Tank

रितेश अग्रवाल यांनी रिॲलिटी टेलिव्हिजन शो शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझन पासूनच न्यायाधीश म्हणून सामील झाले होते. हा शो शार्क टँक यूएसए या अमेरिकन रिॲलिटी संकल्पनेवर आधारित आहे. ज्यामध्ये स्टार्टअप वर व्यावसायिकांकडून गुंतवणूक केली जाते.

नुकताच शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन येऊन गेला ज्यात रितेश अग्रवाल यांनी 5-6 करोडची गुंतवणूक ही वेगवेगळ्या स्टर्टअप मध्ये केली आहे.

Ritesh Agarwal Awards and Honors

  • Top 50 Entrepreneurs 2013
  • Business InsiderTie Lumis Entrepreneurial Excellence Award
  • Thiel Fellowship
  • ’20 under 20′ Thiel Fellowship 2013
  • Eight hottest teenage start-up founders 2013
  • TATA First Dot Awards
  • Tie-Lumis Entrepreneurial Excellence Award 2014
  • Finalist in the Global Student Entrepreneurship Awards
  • Global Student Entrepreneur Awards

Ritesh Agarwal Overview 

नाव रितेश अग्रवाल
जन्म दिनांक 16 नोव्हेंबर 1993
जन्मस्थान रायगड, ओडिशा, भारत
वय 30 वर्षे (इ.स. 2023)
व्यवसाय उद्योजक, उद्योजक आणि लेखक
संस्थापक OYO रूम्स
OYO ची स्थापना इ.स. 2013 मध्ये
शिक्षण 12 वी आणि महाविद्यालय सोडलेले
धर्म हिंदू
राष्ट्रीयता भारतीय
नेटवर्थ $२ बिलियन (अंदाजे ₹16,000 कोटी )
वैवाहिक स्थिती विवाहित
छंद सायकलिंग