Vineeta Singh Sugar Cosmetics: विनीता सिंग या मेकअप ब्रँड SUGAR Cosmetics च्या सह-संस्थापक आणि CEO आहेत. यांना तुम्ही शार्क टँक इंडिया मधेही पहिले असाल. विनीता सिंग या भारतातील सर्वात शक्तिशाली आणि स्वयंनिर्मित महिला उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांनी आपले शिक्षण IIT मद्रास आणि IIM अहमदाबाद मधून पूर्ण केले आहे.
Contents
Who Is Vineeta Singh
विनीता सिंग या एक भारतील उद्योजिका, CEO आणि शुगर कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापिका आहेत. त्यांचा जन्म 1983 मध्ये आनंद गुजरात मध्ये झाला असून. त्या SonyLIV वर चालू असलेल्या शार्क टँक इंडिया या रिॲलिटी टीव्ही शोमध्ये शार्क (म्हणजे न्यायाधीश/गुंतवणूकदार) आहेत.
Vineeta Singh Sugar Cosmetics
विनिता सिंग आणि त्यांचे पती कौशिक मुखर्जी यांनी 2015 मध्ये शुगर कॉस्मेटिक्सची स्थापना केली होती. शुगर कॉस्मेटिक्सच्या आधी, विनीता सिंग यांनी दोन स्टार्टअप्समध्ये हात आजमावला – पहिला स्टार्टअप हा क्वेट्झल होता ज्याची स्थापना 2007 मध्ये केली होती. ही कंपनी रिक्रूटर्सना बॅकग्राऊंड व्हेरीफिकेशन ची सेवा प्रदान करत.
तर दुसरा स्टार्टअप हा फॅब-बॅग होता जो सबस्क्रिप्शन मॉडेलवर काम करत असे जो ग्राहकांना मासिक सौंदर्य उत्पादने प्रदान करत असे.
त्यांनी त्यांच्या शुगर कॉस्मेटिक्सच्या कंपनीची सुरवात ही मुंबईतील एका लहान घरातून केली होती जिथे पावसाळ्यात पूर यायचा.
शुगर कॉस्मेटिक्सची सध्याची मार्केट किंमत ही 4100 कोटी रुपये इतकी आहे. विनीता आणि त्यांचे पती कौशिक यांचे त्यांच्या कंपनी शुगर कॉस्मेटिक्समध्ये समान शेअर्स आहेत, जे प्रत्येकी 16.55% आहेत. ही कंपनी एकेकाळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती तेव्हा विनीता आणि त्यांचे पती कौशिक यांनी खूप मेहनत घेऊन ही कंपनी खूप पुढे नेली आणि आता ही कंपनी भारतातील टॉप सौंदर्य उत्पादन कंपनी पैकी एक आहे.
What Is The Net Worth Of Vineeta Singh
41 वर्षीय विनिता सिंग यांची एकूण संपत्ती सुमारे 300 कोटी रुपये इतकी आहे. यात शुगर कॉस्मेटिक्सचा मोठा वाटा आहे. त्यांनी IIM-A मधून जेव्हा शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्यांना 1 कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर देण्यात आली होती. पण काहीतरी मोठे करायचे या इच्छाशक्तीमुळे त्यांनी ती ऑफर नाकारली.
हे पण वाचा: Anupam Mittal Net Worth 2024
Vineeta Singh Education
विनिता यांनी 2001 मध्ये दिल्ली पब्लिक स्कूल, आर.के. पुरम येथुन आपले 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मद्रास) मध्ये प्रवेश घेतला. त्यांनी IIT-M मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे शिक्षण 2005 पूर्ण केले आणि त्यानंतर, त्यांनी 2007 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) मधून एमबीए केले.
Vineeta Singh Husband
विनिता यांच्या पतीचे नाव हे कौशिक मुखर्जी असून त्यांचा जन्म 17 जून 1983 रोजी कोलकाता येथील एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. त्यांनी डॉन बॉस्को शाळेत शिक्षण घेतलेअसून. नंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस (BITS) पिलानी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद येथून एमबीए केले, जिथे त्यांना त्याच्या बॅचचा सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर म्हणून निवडण्यात आले. इथेच त्यांची भेट विनीता सिंग यांच्याशी झाली आणि नंतर दोघांनी मिळून शुगर कॉस्मेटिक्सची सुरवात केली.
Vineeta Singh Shark Tank
विनिता यांनी शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये सुमारे 1 कोटी रुपये आणि सीझन 2 मध्ये सुमारे 9.69 कोटींची गुंतवणूक केली होती. सीझन 3 मध्ये त्यांनी आतापर्यंत 5.80 कोटी रुपये गुंतवले आहेत. ज्यामध्ये त्यांनी एकूण नऊ सौदे केले आहेत. आतापर्यंत त्यांनी 16.49 कोटी रुपयांची गुंतवणूक ही शार्क टँक इंडिया वरील वेगवेगळ्या बिसिनेसवर केली आहे. ही त्यांच्या एकूण संपत्तीच्या 5.89% इतकी आहे.
Vineeta Singh Car Collection
विनीता सिंग यांच्या कार कलेक्शन मध्ये मर्सिडीज-बेंझ जीएलएसचा समावेश आहे, ज्याची किंमत रु. 1.29 कोटी आहे. तर मर्सिडीज-बेंझ ई क्लास ज्याची किंमत 88 लाख रुपये आहे आणि व्होल्वो XC90 आहे, ज्याची किंमत रु 98.50 लाख आहे आणि फ्लीटमध्ये एक स्कोडा ऑक्टाव्हिया आहे, ज्याची किंमत रु 30.45 लाख आहे.
Awards and recognition
- उद्योजक पुरस्कार, दिल्ली (2019) द्वारे स्टार्ट-अप ऑफ द इयर पुरस्कार.
- फोर्ब्स इंडिया (2021) द्वारा डब्ल्यू-पॉवर पुरस्कार.
- बिझनेसवर्ल्ड (2021) द्वारे BW व्यत्यय 40 अंडर 40 पुरस्कार
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची यंग ग्लोबल लीडरशिप लिस्ट (2022).
- फॉर्च्युनचे 40 अंडर 40 (2021).
- त्यांनी 2001-2005 मध्ये 4 इंटर IIT स्पोर्ट्स मीट्समध्ये IIT मद्राससाठी 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकली आहेत.