Navyugmarathi

Vijay Shekhar Sharma: एका निर्धाराने केली करोडोंची कंपनी स्थापन

Vijay Shekhar Sharma: तर आज आपण जाणून घेणार आहोत एका लहानश्या खोलीतून विजय शेखर शर्मा यांनी कशी सुरु केली करोडोची कंपनी आणि कसा होता त्यांचा यामागील प्रवास.

Who Is Vijay Shekhar Sharma

विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे संस्थापक असून ते एक भारतीय बिसिनेस मॅन आहेत. ते एका मध्यम वर्गीय परिवारातून येतात.

Vijay Shekhar Sharma Paytm

विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम सुरु करण्याआधी One97 Communications Limited ही कंपनी सण 2000 मध्ये स्थापन केली होती जी जोक्स, रिंगटोन, परीक्षेचा निकाल आणि क्रिकेट मैचचा स्कोर दाखवत असे. हीच कंपनी पुढे जाऊन पेटीएम पैरेंट कंपनी बनली.

पण विजय यांच्या आयुष्यात नशीब तेव्हा पालटले जेव्हा त्यांनी 2010 मध्ये साउथ दिल्ली येथे एका भाड्याच्या घरातून डिजिटल पेमेंट आणि फाइनेंशियल सर्विसेस देणारी कंपनी पेटीएमची सुरवात केली. तेव्हापासून त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही.

पेटीएम सर्वात मोठा फायदा तेव्हा झाला जेव्हा नोव्हेंबर 2016 मध्ये संपूर्ण भारतात नोटबंदी झाली. तेव्हा पेटीएमच्या ग्राहकांत सर्वात सर्वात जास्त वाढ झाली. तेव्हा प्रत्येक छोटा मोठा दुकानदार, ग्राहक पेटीएम क्यूआर कोड स्कैनर वापरताना दिसू लागले.

कंपनीची ग्रोवथ बघून अमेरिकेचे दिग्गज  गुंतवणूकदार वॉरन बफे यांनीही या कंपनीत पैसे गुंतवले

Vijay Shekhar Sharma Family Details

विजय शेखर शर्मा यांचे वडील सुलोच प्रकाश शर्मा हे एक शालेय शिक्षक होते तर त्यांची आई आशा शर्मा या गृहिणी होत्या. त्यांचे लग्न हे मृदुला शर्मा यांच्याशी झाले असून त्यांना एक मुलगा (विवान शर्मा) आहे.

Vijay Shekhar Sharma Net Worth

सण 2022 मध्ये अमेरिकेच्या बिजनेस मैगजीन फोर्ब्स ने सांगितले होते की विजय शेखर शर्मा यांची नेटवर्थ 1.2 अब्ज डॉलर इतकी आहे जी 2021 मध्ये 2.3 अब्ज तर 2020 मध्ये 2.4 अब्ज डॉलर इतकी होती.

विजय हे सध्या दिल्ली हाई कोर्ट जवळील अमीर उमरा भागातील गोल्फ लिंक्समध्ये मध्ये राहतात. असे म्हटले जाते की विजय शेखर शर्मा यांनी जेव्हा ही प्रॉपर्टी खरेदी केली तेव्हा त्याची किंमत 82 करोड़ रुपये इतकी होती.

हे पण वाचा : Who Is Ritesh Agarwal?

Vijay Shekhar Sharma Education

विजय यांनी त्यांचे शालेय शिक्षण अलीगढजवळील हरदुआगंज या छोट्याशा गावातून पूर्ण केले आहे. तर त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 19 व्या वर्षी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (आता दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) मधून B.Tech ची पदवी घेतली आहे.

Vijay Shekhar Sharma Awards and Honors

  • फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून स्थान दिले आहे.
  • 2017 मध्ये टाइम मॅगझिनच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश.
  • 2016 मध्ये इकॉनॉमिक टाइम्सने सादर केलेला ईटी उद्योजक ऑफ द इयर.
  • 2017 मधील 50 सर्वात प्रभावशाली तरुण भारतीयांपैकी एक म्हणून GQ द्वारे ओळख.
  • 2016 मध्ये अमिटी विद्यापीठ, गुडगाव येथून मानद डॉक्टरेट.
  • यश भारती, उत्तर प्रदेश सरकारचा सर्वोच्च राज्य नागरी पुरस्कार, 2016 मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला.
  • 2016 मध्ये NDTV इंडियन ऑफ द इयर.
  • AIMA द्वारे 2018 मध्ये पुरस्कृत वर्षातील सर्वोत्कृष्ट उद्योजक.
  • सप्टेंबर 2015 मध्ये SABER पुरस्काराने नामांकित केल्यानुसार वर्षातील CEO
  • 2015 मध्ये इकॉनॉमिक टाईम्स द्वारे ओळखले जाणारे 40 वर्षाखालील भारतातील सर्वात लोकप्रिय व्यावसायिक नेते.

Vijay Shekhar Sharma Downfall

पेटीएमचा तेव्हा चालू झाला जेव्हा त्यांची पैरेंट कंपनी One97 Communications ने 2021 मध्ये IPO आणला तेव्हा सगळ्यांना वाटलं की यात सर्वाना खूप फायदा होईल पण झाले उलटेच कंपनीने 2080 रुपये ते 2150 रुपये प्रति शेयर ही किंमत ठरवली होती पण ज्यादिवशी कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट झाली तेव्हा कंपनीला प्रति शेयर नऊ टक्के डिस्काउंट द्यावा लागला त्यामुळे 1950 रुपये प्रति शेयर ने कंपनी लिस्ट झाली.

जेव्हा कंपनी लिस्ट झाली त्याच दिवशी कंपनीच्या शेयर मध्ये 27 टक्के घसरण झाली व प्रति शेयरची किंमत 1564 रुपये इतकी झाली. कंपनीने लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी 810 रुपये प्रति शेअर बायबैक पण केला पण याचा काय फायदा झाला नाही.

यात कमी होती की काय म्हणून रिजर्व बैंक ने 31 जानेवारी 2024 रोजी पेटीएम पेमेंट्स बैंक (PPBL) वर नियमांच्या उल्लंघनाबद्दल बंदी घातली. तसेच वॉलेट, FASTag यांच्यावरही बंदी घातली.

Vijay Shekhar Sharma Overview

नाव विजय शेखर शर्मा
जन्म दिनांक 7 जून 1978
जन्मस्थान अलीगढ, उत्तर प्रदेश, भारत
वय 45 वर्षे (इ.स. 2023)
व्यवसाय उद्योजक
संस्थापक Paytm
Paytm ची स्थापना इ.स. 2010 मध्ये
शिक्षण B.Tech
धर्म हिंदू
राष्ट्रीयता भारतीय
नेटवर्थ 1.2 अब्ज (इ.स. 2022)
वैवाहिक स्थिती विवाहित