Navyugmarathi

Kunal Shah Net Worth: कोण आहेत कुणाल शाह? ज्यांचा पगार 15000 रुपये पण संपत्ती 15000 करोडची

Kunal Shah Net Worth: जरी आपण आज कुणाल शाह यांना CRED चे संस्थापक म्हणून ओळखत असलो तरी एक काळ असा होता की त्यांना पैशाचा कमतरतेमुळे डेटा एन्ट्रीचा जॉब देखील करावा लागला होता चला तर मग जाणून घेऊया कुणाल शाह यांची रोचक कहाणी.

Who Is Kunal Shah

कुणाल शाह यांचा जन्म हा मुंबईत झाला असून हे पेशाने CRED आणि फ्रीचार्ज संस्थापक आहेत. त्यांनी  2003 मध्ये विल्सन कॉलेजमधून तत्त्वज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर MBA साठी प्रवेश घेतला पण त्यांनी आपल्या व्यावसायिक ध्येयांचा पाठलाग करण्यासाठी मधूनच आपले शिक्षण सोडले.

त्यांनी CRED बनवण्याआधी PaisaBack सारखी साईट बनवली ज्यातून दुकानांसाठी रिफंड आणि विशेष सवलती देणारी मोहीम सुरू केली.

कुणाल यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी CRED सुरु करण्याआधी Freecharge ची सुरवात केली होती जी त्यांनी 2015 मध्ये $450 मिलियन डॉलरला Snapdeal ला विकले होते.

हे पण वाचा : Rakesh Jhunjhunwala Net Worth

Kunal Shah Family Details

कुणाल शाहचा जन्म 20 मे 1983 रोजी मुंबईत एका सामान्य गुजराती कुटुंबात झाला.  त्याची आई विमा क्षेत्रात काम करत होती आणि त्यांच्या वडिलांचा त्यांच्या गावी औषध वितरणाचा छोटासा व्यवसाय होता.

Kunal Shah Net Worth

शाह यांचा मासिक पगार हा 15,000 रुपये आहे यामागील सत्य हे त्यांनी एका Instagram कथेत सांगितले की जोपर्यंत त्यांचा कंपन्या प्रॉफिटेबल बनत नाहीत तोपर्यंत ते इतकाच पगार घेतील.

त्यांच्या कंपनीचा महसूल 2021 मधील 95 कोटी रुपयांवरून 2022 मध्ये 422 कोटी रुपयांवर गेला होता तो सुमारे 340 टक्क्यांनी वाढला असला तरीही कंपनीला त्या वर्षी 1279 कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. 2021 च्या सुरुवातीला कुणाल शाहची अंदाजे संपत्ती 15,000 कोटी रुपयांची होती.

Kunal Shah Education

कुणाल यांचा शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण त्यांचा गावी एका खाजगी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी तत्वज्ञानात कला शाखेची पदवी प्राप्त करण्यासाठी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी MBA पदवी साठी नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्येही शिक्षण घेतले पण त्यांनी आपले व्यावसायिक करिअर वर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षण मधूनच सोडले.

Kunal Shah Wife

Bhavna Shah

कुणाल शाह यांच्या पत्नीचे नाव हे भावना शाह आहे. त्या पेशाने एक बिसिनेस वूमन लिडर आहेत. तसेच त्या एक स्पष्टवक्त्या आणि एक दयाळू व्यक्तिमत्वाच्या महिला आहेत.

Kunal Shah FreeCharge

सण 2010 मध्ये शाह यांनी ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांसाठी सवलत आणि कॅशबॅक देणारी डिजिटल पेमेंट फर्म फ्रीचार्जची स्थापना केली. सुरवातीला फ्रीचार्ज फक्त मोबाईल रिचार्जवर लक्ष केंद्रित कात होते पण हळू हळू त्यांनी बिल पेमेंट सारख्या इतर सेवांचा देखील समावेश करून घेतला.

आपल्या दूरदृष्टीने त्यांनी याला खूप पुढे नेले भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्णन केले पुढे जाऊन 2015 मध्ये, Snapdeal ने याला 400 दशलक्ष डॉलर्सला विकत घेतले, ज्यामुळे देशातील एक प्रमुख उद्योजक म्हणून शाहची प्रतिष्ठा मजबूत झाली.

Kunal Shah CRED

कुणाल यांनी CRED ची स्थापना 2018 मध्ये बंगलोर येथून केली होती . CRED हे एक व्यासपीठ आहे जे वापरकर्त्यांना वेळेवर क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी प्रोत्साहन देते. कुणाल यांनी CRED सुरु करण्याआधी फ्रीचार्ज सुद्धा सुरवात केली होती.

Kunal Shah In The Role As An Investor

कुणाल यांनी एक उत्तम व्यवसाय तयार केला आहे हे सर्वाना माहिती आहे पण ते एक चांगले गुंतवणूकदारपण आहेत. त्यांनी 2016 मध्ये वाय कॉम्बिनेटर (अमेरिकन इनक्यूबेटर) मध्ये सामील होऊन आपला गुंतवणूक प्रवास सुरू केला.

यानंतर जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत त्यांनी सेक्वॉया कॅपिटलमध्ये सल्लागार म्हणून काम केले. आणि त्यानंतर त्यांनी टाइम्स ग्रुप आणि एंजेललिस्टमध्ये अनेक महिने सल्लागार म्हणून काम केले.

त्यांनी Unacademy, Razorpay, BharatPe, Rapido इत्यादींसह अनेक व्यसायात आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांचा गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एकूण 218 हुन अधिक कंपन्या आहेत.

Kunal Shah Awards and Honors

  • फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स (2015)
  • वर्षातील सर्वोत्कृष्ट उद्योजक (2016)
  • टॉप 10 सर्वात नाविन्यपूर्ण सीईओ (2017)
  • तरुण व्यावसायिक नेता (2018)
  • भारतातील सर्वाधिक प्रशंसनीय उद्योजक (2019)
  • प्रभावशाली टेक लीडर (2020)

Kunal Shah Overview 

नाव कुणाल शाह
जन्म दिनांक 20 मे 1983
जन्मस्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 40 वर्षे (इ.स. 2023)
संस्थापक CRED आणि फ्रीचार्ज
शिक्षण एमबीए ड्रॉपआउट
धर्म हिंदू
राष्ट्रीयता भारतीय
नेटवर्थ 15,000 करोड
वैवाहिक स्थिती विवाहित