Navyugmarathi

Income Mutual Funds In India 2024: इनकम फंड म्हणजे काय आणि काय आहेत याचे फायदे चला पाहुया

Income Mutual Funds: भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचे साधन म्हणजे म्युच्युअल फंड. यात तुम्हाला इतर गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा मिळतो. यात अनेक प्रकारचे फंड तुम्हाला बघायला मिळतात जे कधी कधी चांगला तर कधी कधी वाईट परतावा मिळवून देतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे इनकम फंड.

तुमच्या यशस्वी गुंतवणुकीसाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी आम्ही हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यात आपण भारतातील विविध प्रकारच्या इन्कम फंडांबद्दल आणि त्यांच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत.

What Are Income Funds?

इनकम फंड हा डेट फंड च्या श्रेणीत येतो. हा फंड कॉर्पोरेट बाँड, डिबेंचर, सरकारी सिक्युरिटीज इत्यादी कर्ज साधनांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करतो. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या मते इन्कम फंड हा डेट फंडाच्या श्रेणीत येतो कारण याचा कालावधी 4 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.

इन्कम फंडांचे दोन प्रकार आहेत

  1. मध्यम ते दीर्घ कालावधीचा निधी(Medium to Long Duration Fund) – मॅकॉले कालावधी = चार ते सात वर्षांच्या दरम्यान
  2. दीर्घ कालावधीचा निधी(Long Duration Fund) – मॅकॉले कालावधी = सात वर्षांपेक्षा जास्त

How Does Income Mutual Funds Work?

इनकम फंडाचा फंड मॅनेजर नेहमी गुंतवणूकदाराला चांगला नफा मिळवून देण्यासाठी प्रयन्त करत असतो. तो यासाठी व्याजदराच्या नियमांची पर्वा करत नाही. याचा अर्थ असा की इन्कम फंडचे व्याजदर वाढत किंवा कमी होत असले तरी हे फंड परतावा देण्याचा प्रयन्त करतात.

हे फंड सक्रिय गुंतवणूक व्यवस्थापनाद्वारे हाताळले जातात. यात व्यवस्थापकांद्वारे दोन व्यापक धोरणे अवलंबली जातात

  • व्याज उत्पन्न निर्माण करणे – जे फंड परिपक्वतेपर्यंत होइस तोपर्यंत ठेऊन मिळवले जातात.
  • कमाईचा नफा – जो कर्ज साधनांची किंमत वाढल्यास बाजारात विकून मिळवला जातो.

सहसा, हे फंड उच्च सुरक्षा किंवा उच्च दर्जाचे रेटिंग असलेल्या आणि कमी व्याजदर जोखीम असलेल्या कर्ज साधनांना प्राधान्य देतात. जर तुम्ही इनकम फंडांच्या मागील काही वर्षाच्या कामगिरीवर नजर टाकली तर हे फंड बँक ठेवींद्वारे ऑफर केलेल्या परताव्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देताना आपणास दिसते.

हे पण वाचा: What Is Debt Fund In Mutual Funds?

Who should invest in an Income Mutual Funds?

इनकम म्युच्युअल फंड मध्ये त्यांनी गुंतवणूक करावी ज्यांचे गुंतवणूक उद्दिष्ट हे मध्यम जोखीम आणि नियमित परतावा मिळविण्याचे आहे. कमी जोखमीच्या क्षेत्रात म्युच्युअल फंड शोधू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

How To Invest In Income Funds?

तुम्ही थेट AMC मार्फत इनकम फंडात गुंतवणूक करू शकता किंवा कोणत्याही ब्रोकरद्वारे इनकम फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

Features Of An Income Funds

Expense Ratio: 

खर्चाचे प्रमाण हे तुम्ही गुंतवलेल्या फंडच्या एकूण मालमत्तेची टक्केवारी असते जी फंड हाऊस फंड व्यवस्थापन सेवा ऑफर करण्यासाठी शुल्क म्हणून आकारते. SEBI ने इनकम फंडसाठी 2.25% वर खर्चाच्या गुणोत्तराची वरची मर्यादा तयार केली आहे. हा फंड डेट फंडच्या अंतर्गत येत असल्याने याचा परतावा जास्त नसतो. त्यामुळे, उच्च खर्चाचे प्रमाण असलेल्या फंडाचा थेट परिणाम तुमच्या कमाईवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कमी खर्चाचे प्रमाण असलेले फंड शोधले पाहिजेत.

Risks and Returns:

हा फंड डेट फंडाच्या प्रकारात येत असल्याने यात क्रेडिट जोखीम आणि व्याजदराची जोखीम दोन्ही असते.

  • यामध्ये फंड मॅनेर्जने मुद्दल आणि व्याजाची परतफेड न करण्याचा धोका आहे.
  • फंडाच्या सिक्युरिटीजच्या मूल्यावर व्याजदरातील कमी-अधिक बदलाच्या परिणामाचा आहे.

याव्यतिरिक्त, इनकम फंडाचा फंड मॅनेजर अधिक परतावा निर्माण करण्यासाठी कमी क्रेडिट गुणवत्ता रेटिंगसह सिक्युरिटीजमध्ये देखील गुंतवणूक करू शकतो. यामुळे पोर्टफोलिओचा एकूण धोका वाढण्याची शक्यता असते.

घटत्या व्याजदरात इनकम फंड रिटर्न हे 7-9% च्या श्रेणीत असू शकतात. हे फंड त्यांच्या गुंतवणुकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी व्याजदरात येणाऱ्या अस्थिरतेचा फायदा घेतात.

What Advantages Come With Buying Income Mutual Funds?

  • बँक ठेवींच्या तुलनेत, गुंतवणुकीवर कमी कालावधीत चांगला परतावा मिळवून देतात. (पण कोणत्याही निश्चित परताव्याची हमी देत नाही.)
  • इनकम म्युच्युअल फंडांमध्ये जास्त तरलता असते. या शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे कोणत्याही वेळी काढले जाऊ शकतात. (विशिष्ट कालावधी असलेल्या मुदत ठेवींच्या बाबतीत हे नियम लागू होत नाहीत.)
  • हे डेट फंड तज्ञांद्वारे सक्रियपणे चालवले जातात. पोर्टफोलिओसाठी प्रत्येक मालमत्तेच्या निवडीपासून संभाव्य व्याजदर मिळवून देण्याचे काम हे तज्ञांद्वारे केले जाते.
  • हे फंड गुंतवणूक आणि पैसे काढण्याच्या बाबतीत गुंतवणूकदाराला लवचिकता देतात. हे सुनिश्चित करते की गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवेल.
  • यामध्ये गुंतवणूकदारांना कर लाभ प्रदान होतो, जर तुम्ही 30% च्या सर्वोच्च आयकर ब्रॅकेटमध्ये येत असाल, तर इनकम फंडामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो. एलटीसीजीवर इंडेक्सेशनसह गुंतवणुकीवर 20% कर आकारला जातो, तर तुम्ही मुदत ठेवीवर जे व्याज मिळवाल त्यावर तुम्हाला तुमच्या कर स्लॅबनुसार कर आकारला जातो.