Navyugmarathi

TGIF Agribusiness Limited IPO: काय होईल का तुम्हाला या आयपीओचा फायदा 2024 मध्ये

TGIF Agribusiness Limited IPO: हा आयपीओ 6.39 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 6.88 लाख  फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.

TGIF Agribusiness Limited IPO

TGIF Agribusiness आयपीओ 8 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 10 मे 2024 रोजी बंद होईल. TGIF Agribusiness च्या आयपीओचे वाटप हे सोमवार, 13 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. BSE, SME वर याची अंतिम यादी बुधवार, 15 मे, 2024 रोजी जाहीर होईल.

TGIF Agribusiness च्या आयपीओची प्राइस बँड ₹93 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 1200 शेअर्सचा आहे आणि ₹111,600 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (2400 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹223,200 आहे.

Hem Securities Limited हे TGIF Agribusiness च्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे bigshare services pvt ltd आहेत. Hem Finlease हे TGIF Agribusiness च्या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.

About TGIF Agribusiness Limited

TGIF Agribusiness Limited ची स्थापना 2014 मध्ये झाली असून याला आधी ARV Farmpro LLP म्हणून ओळखले जात होते. कंपनी फळे आणि भाजीपाला  लागवडीत सक्रिय आहे.

कंपनीचे उप्त्पादन हे अधिकतर ड्रॅगन फ्रूट, डाळिंब आणि लाकूड लागवड, म्हणजे सागवान झाडे यांचे आहे.कंपनी हंगामी भाज्या आणि फळे जसे की टरबूज, लिंबू आणि मिरची यांची देखील शेती करते.

TGIF Agribusiness Limited ची शेतजमीनी या राजस्थानमधील अजरी, कासिंद्रा आणि कोजरा येथे आहेत आणि त्या ऐकून 110 एकर क्षेत्रफळ इतके आहेत. याजमिनी निरज छगनराज गेमावत, निरज छगनराज गेमावत एचयूएफ, रचना गेमावत आणि विपिन मोहरीर यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.

कंपनी आपली बहुतांश उत्पादने B2B बिझनेस मॉडेलद्वारे विक्री करते जसे की घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, किरकोळ साखळी, हायपरमार्केट आणि मंडई इत्यादी. कंपनीची पुढील योजना ही डायरेक्ट2होम सर्व्हिस नावाच्या B2C मॉडेलद्वारे ग्राहकांना आपली उत्पादने थेट विकण्याची आहे.

TGIF Agribusiness Limited IPO Details

IPO Date 8 मे, 2024 ते 10 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹93 प्रति शेअर
Lot Size 1200 शेयर्स
Total Issue Size 687,600 शेयर्स (₹6.39 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 687,600 शेयर्स (₹6.39 कोटींचा अंदाजित )
Market Maker portion 34,800 शेअर
Issue Type फिक्स्ड प्राइस इश्यू आयपीओ
Listing At BSE SME
Share holding pre issue 1,900,000
Share holding post issue 2,587,600

Timeline Of TGIF Agribusiness Limited IPO

TGIF Agribusiness चा आयपीओ हा बुधवार, 8 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि शक्रवार, 10 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date बुधवार, 8 मे , 2024
IPO Close Date शक्रवार, 10 मे, 2024
Basis of Allotment सोमवार , 13 मे, 2024
Initiation of Refunds मंगळवार, 14 मे, 2024
Credit of Shares to Demat मंगळवार, 14 मे, 2024
Listing Date बुधवार, 15 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate गुरुवार, 10 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : कसा असेल फायनलिस्टिंग टेक्नॉलॉजीजचा आयपीओ

Financial Details Of TGIF Agribusiness Limited IPO

TGIF Agribusiness ने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी  12.14% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 12.63% नफा कमावला आहे.

Period Ended 30 नोव्हेंबर  2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 282.32 187.52 65.33 291.62
Revenue 171.79 232.28 207.14 181.59
Profit After Tax 81.41 130.07 115.48 38.18
Net Worth 190.00 175.89 45.82 257.91
Total Borrowing 67.30
Amount in ₹ Lakhs

 

TGIF Agribusiness Limited IPO Key Factors

TGIF Agribusiness चा आपीओचे बाजार मूल्य हे रु. 24.06 कोटी आहे.

KPI Values
RoNW 42.85
P/BV 9.3
PAT Margin (%) 47.7

 

FAQ’s

Tgif agribusiness limited website link?

तुम्ही या  लिंक वर क्लिक करून TGIF Agribusiness च्या वेबसाईटला भेट देऊ शकता https://tgifagri.com/

When does the TGIF Agribusiness IPO launch?

TGIF Agribusiness चा आयपीओ हा बुधवार, 8 मे , 2024 रोजी ओपन होईल

When is the listing date for the TGIF Agribusiness IPO?

TGIF Agribusiness 15 मे, 2024 रोजी शेअर मार्केटवर लिस्ट होईल आणि  10 मे, 2024 रोजी बंद होईल.