Navyugmarathi

Energy-Mission Machineries: काय खरच तुम्हाला या आयपीओमधून होईल फायदा?

Energy-Mission Machineries: हा आयपीओ 41.15 कोटी रुपयांचा असेल. या आयपीओमध्ये 29.82 लाख  फ्रेश शेअर्स विक्रीसाठी असतील.

Energy-Mission Machineries IPO

एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडचा आयपीओ 9 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 13 मे 2024 रोजी बंद होईल. एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडच्या आयपीओचे वाटप हे मंगळवार, 14 मे, 2024 रोजी बंद होईल अशी अपेक्षा आहे. BSE, SME वर याची अंतिम यादी गुरुवार, 16 मे, 2024 रोजी जाहीर होईल.

एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडच्या आयपीओची प्राइस बँड ₹131 ते ₹138 प्रति शेअर सेट आहे. तर अर्जासाठी किमान लॉट आकार 1000 शेअर्सचा आहे आणि ₹138,000 इतकी गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना आवश्यक आहे.

तसेच HNI साठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (2000 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम ₹276,000 आहे.

Hem Securities Limited हे एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत , तर या इश्यूचे रजिस्ट्रार हे Bigshare Services Pvt Ltd आहेत. Hem Finlease हे या आयपीओचे मार्केट मेकर आहेत.

About Energy-Mission Machineries Limited

एनर्जी-मिशन मशिनरीज (इंडिया) लिमिटेडची स्थापना 2011 मध्ये झाली असून कंपनी औद्योगिक मेटल फॅब्रिकेशनसाठी विविध मेटल फॉर्मिंग मशीन डिझाइन आणि तयार करते. कंपनीच्या मशीनचा वापर  स्टील, फर्निचर, ऑटोमोटिव्ह, HVAC, शेती, बांधकाम, लिफ्ट, अन्न प्रक्रिया, यासारख्या विविध उद्योगांमध्ये केला जातो.

कंपनीच्या उत्पादनांमध्ये मुख्यतः हायड्रॉलिक प्रेस, कातरणे, प्लेट रोलिंग, प्रेस ब्रेक, आणि बसबार बेंडिंग, कटिंग आणि पंचिंग मशीन यांचा समावेश आहे.

कंपनी आपली उत्पादने यूएई, यूएसए, रशिया, नेपाळ, केनिया,स्वित्झर्लंड,  युगांडा आणि सौदी अरेबिया येथे निर्यात करते.

कंपनीने एप्रिल 2023 ते ऑगस्ट 2023 पर्यंत, आपली उत्पादने 1,050 पेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवली तसेच 1,487 पेक्षा जास्त मेटल फॉर्मिंग मशीनचा पुरवठा केला, ज्यामध्ये 600 पेक्षा जास्त विविध प्रकारची उत्पादने समाविष्ट आहेत.

कंपनीची वार्षिक क्षमता ही 900 मशीन्स तयार करण्याची आहे.

कंपनीची उत्पादन सुविधा ISO 9001:2015 प्रमाणित आहे. तर कंपनीची उत्पादन सुविधा ही साणंद, अहमदाबाद येथे 18,234 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे

Energy-Mission Machineries Limited IPO Details

IPO Date 9 मे, 2024 ते 13 मे, 2024
Face Value ₹10 प्रति शेयर
Price Band ₹131 ते ₹138 प्रति शेअर
Lot Size 1000 शेयर्स
Total Issue Size 2,982,000 शेयर्स (₹41.15 कोटींचा अंदाजित )
Fresh Issue 2,982,000 शेयर्स (₹41.15 कोटींचा अंदाजित )
Market Maker portion 150,000 शेअर
Issue Type बुक बिल्ट इश्यू आयपीओ
Listing At SME ,NSE
Share holding pre issue 8,344,500
Share holding post issue 11,326,500

Timeline Of Energy-Mission Machineries Limited IPO

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ हा गुरुवार, 9 मे, 2024 रोजी ओपन होईल आणि सोमवार, 13 मे, 2024 रोजी बंद होईल.

IPO Open Date गुरुवार, 9 मे , 2024
IPO Close Date सोमवार, 13 मे, 2024
Basis of Allotment मंगळवार , 14 मे, 2024
Initiation of Refunds बुधवार, 15 मे, 2024
Credit of Shares to Demat बुधवार, 15 मे, 2024
Listing Date बुधवार, 16 मे, 2024
Date of confirmation of UPI mandate सोमवार, 13 मे, 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता

IPO To Come : Aadhar Housing Finance Limited 2024

Financial Details Of Energy-Mission Machineries Limited IPO

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2022 रोजी  27.31% अधीक महसूल गोळा केला आहे आणि करानंतर 135% नफा कमावला आहे.

Period Ended 31 डिसेंबर 2023 31 मार्च 2023 31 मार्च 2022 31 मार्च 2021
Assets 9,958.11 8,258.65 7,382.45 6,575.72
Revenue 8,399.76 10,066.12 7,906.57 4,834.07
Profit After Tax 674.80 790.01 336.17 95.33
Net Worth 3,027.82 2,353.02 1,563.01 1,226.84
Reserves and Surplus 2,193.37 2,074.87 1,284.86 948.69
Total Borrowing 2,333.05 2,187.82 2,457.23 2,228.59
Amount in ₹ Lakhs

 

Energy-Mission Machineries Limited IPO Key Factors

एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडचा आपीओचे बाजार मूल्य हे रु. 156.31 कोटी आहे.

KPI Values
ROE 25.08%
ROCE 21.86%
Debt/Equity 0.77
RoNW 16.54%
P/BV 4.08
PAT Margin (%) 8.1

 

FAQ’s

Who is the owner of Energy-Mission Machineries?
स्नेहल मेहता, हे एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडचे मालक आहेत.

When does the Energy-Mission Machineries IPO launch?
एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडचा आयपीओ 9 मे 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल.

When is the listing date for the Energy-Mission Machineries IPO?
बुधवार, 16 मे, 2024 रोजी एनर्जी-मिशन मशिनरीज लिमिटेडचा आयपीओ स्टॉक मार्केटवर लिस्ट होईल.